मनोगत

दुर्मिळ लोककलेचा खजिना म्हणजे सोंगी भारुड.
काही शतकांपूर्वीच्या भारतातील खेडोपाड्याच्या लोकजीवनातील पात्रे म्हणजेच वासुदेव, पिंगळा, जोशी, पोतराज वगैरे. या पात्रांच्या माध्यमातून आजच्या यांत्रिक युगात देखिल लोकरंजन करता करता आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच सामाजिक प्रबोधन आणि संस्कॄतीची जोपासना उत्तम पद्धतीने होऊ शकते. हे लक्षात आल्यामुळेच भारुड या लोककलेकडे वाटचाल सुरु झाली.